संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आले आहे. त्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी संसदेत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेत राहुल गांधींनीही या कार्यक्रमात उपस्थिती लावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एकाच फ्रेममध्ये दाखवणारे छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
पावसाळी अधिवेशन पुढे ढकलल्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत झालेल्या चहापानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक नेते उपस्थित होते, असे IANS ने पोस्ट केले.