पाणी टंचाईमुळे महाराष्ट्रात तीव्र दुष्काळाची परिस्थिती जाणवत आहे. २० मे रोजी महाराष्ट्रात पाच टप्प्यातील मतदान संपन्न झाल्यानंतर राज्यातील दुष्काळाच्या झळांचे चित्र माध्यमातून दिसण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवस सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी गेले होते. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेत-शिवारात वेळ घालवला. त्यांचा एक व्हिडीओ विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1796835519487156616
“महाराष्ट्रातील ही दोन चित्र मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवागार चारा आणि दुसरीकडे मराठवाड्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या गुरांना कोरडा चाराही मिळत नाहीये. गुरांचा चारा आणि पाण्याची सोय करण्यासाठी शेतकरी कुटुंबांना घरातील स्त्रीचे सोने गहाण ठेवून पैश्याची जुळवाजुळव करण्याची वेळ आली आहे आणि महायुती सरकार मात्र अजूनही ढिम्मच! आचारसंहितेचे कारण दाखवून सत्ताधारी स्वतःच्या बेजबाबदार कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे हे महाराष्ट्र बघत आहे!”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.