लोकसभा निवडणुकीपूर्वी एलपीजीच्या किमतीत कपात केल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.
तेल विपणन कंपन्यांनी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2024 रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन दरांनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 32 रुपयांनी कमी झाली असून आता 1879 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईबत सिलिंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रुपये झाली आहे. तसेच, चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी कमी होऊन 1930 रुपये झाली आहे.