Saturday, October 12, 2024

गॅस सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ; सर्वसामान्यांना महागाईचा चटका, वाचा नवे दर

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांकडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती सुधारित केल्या जातात. आजही नवीन किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ही वाढ फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडर जवळपास ४८ रुपयांनी महागला आहे. यापूर्वी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे देशात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १९०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.

देशाच्या दक्षिणेकडील सर्वात मोठे महानगर असलेल्या चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीने १९०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबर महिन्यात चेन्नई आणि कोलकाता येथे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ४८ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे दर १९०३ रुपये आणि कोलकातामध्ये १८.५० रुपये झाले आहेत.दुसरीकडे, दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ४८.५ रुपयांची वाढ झाली असून, दोन्ही महानगरांमध्ये त्याची किंमत अनुक्रमे १७४० रुपये आणि १६९२.५० रुपये इतकी झाली झाली आहे. सध्या देशातील चार महानगरांपैकी सर्वात स्वस्त व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईत मिळतो.

दरम्यान, एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या असल्या तरी दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मार्च महिन्यापासून घरगुती सिलिंडरचे दर जैसे थै आहेत. आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपये आहे. तर कोलकातामध्ये गॅस सिलिंडरची किंमत ८२९ रुपये आहे. मुंबईत सध्या गॅस सिलिंडरचे दर ८०२.५० रुपये आहेत. तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८१८.५० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles