कच्च्या तेल आणि गॅसच्या किमतीतील चढउतारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या सुरवातीला LPG सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना नवीन वर्षांचे गिफ्ट दिले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने १९ किलो गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. मात्र, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी आज, १ जानेवारी २०२४ पासून LPG गॅस सिलिंडरच्या नवीन किमती सुधारित केल्या आहेत.
आज, १ जानेवारी २०२४ पासून एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला असून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे तर घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. अशाप्रकारे मिठाईची दुकाने आणि लग्नसमारंभात वापरला जाणारा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आजपासून स्वस्त झाला असून सरकारी तेल कंपनीने गॅस सिलिंडरच्या किमती किंचित कमी केल्या आहेत.