सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. या दरानुसार, आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ३९ रूपयांनी वाढली आहेत. त्यामुळे देशभरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना धक्का बसला असून याचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या नवीन दरानुसार, आता १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून १ हजार ६९१ रुपयांना मिळणार आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रूपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. आज जाहीर झालेल्या नव्या दरानुसार, आता संपूर्ण देशभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर महागले आहेत. ही दरवाढ फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येच असणार आहे.