Saturday, January 25, 2025

किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल…योगी आदित्यनाथ यांचे मोठं वक्तव्य!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फाळणी विरोधी स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे. पाकिस्तानचे एकतर भारतात विलगीकरण होईल किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले आहे.

बांग्लादेशमध्ये आज दीड कोटींपेक्षा जास्त हिंदू ओरडून ओरडून आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, जगाचं तोंड बंद आहे. देशातील धर्मनिरपेक्षवाद्यांची तोंडं बंद आहेत, कारण आम्ही कमजोर आहोत. आपली व्होट बँक आपल्यापासून दूर जाईल, या हेतुने हे सर्वजण गप्प आहेत. व्होट बँकेसाठी मानवीय संवेदना मारुन टाकल्या आहेत. मानवतेच्या रक्षणासाठी त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही. कारण, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी त्याच प्रकारच्या राजकारणाला प्रोत्साहन दिलं आहे. फोडा आणि राज्य करा याच पद्धतीचं राजकारण ही मंडळी करत आहेत, असे म्हणत देशातील इंडिया आघाडीच्या पक्षातील नेत्यांवर नाव न घेता हल्ला बोला केला आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles