Saturday, March 2, 2024

इंडियन ऑईलचा टँकर पलटी; पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी

लखनऊमध्ये इंडियन ऑईल टॅंकरच्या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हे पेट्रोल मिळविण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी झाली होती. जिवाची पर्वा न करता लोक हे पेट्रोल कॅनमध्ये भरून घरी नेताना दिसत होते. एवढंच नाहीतर काही महाभाग हे पेट्रोल बादलीमध्ये भरून घेऊन जात होते. पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे अपघातग्रस्त ठिकाणी कुणी थांबू नये असं ड्रायव्हर सांगत होता, पण लोक त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत इंधन चोरी करण्यात मश्गुल होते. हा संपूर्ण जीवघेणा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर या ठिकाणी गर्दी पांगवण्यात आली. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles