विधानसभेच्या तयारीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सलग सहा वेळा निवडून आलेले माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी आगामी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच त्यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सलग सहा वेळा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बबन शिंदे यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमांमध्ये बोलताना आमदार शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. आता या मतदार संघातून त्यांचे पुत्र रणजीत शिंदे विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार शिंदे यांनी राजकीय सन्यास घेण्याचा निर्णय घेतला असून पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमात पहिल्यांदाच उघडपणे आपल्या पुत्रासाठी मत मागायला सुरुवात केलेली आहे.