माढा लोकसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार, याची सार्वत्रिक उत्सुकता वाढली आहे.माढा तालुक्यातील योगेश पाटील आणि नीलेश पाटील या भावंडांनी माढ्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांची ‘तुतारी’ जोरात वाजणार म्हणून चक्क ११ नव्या बुलेट गाड्यांची पैज जाहीर करून भाजप समर्थकांना आव्हान दिले आहे. मात्र हे आव्हान भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कोणीही समर्थकांनी अद्यापि स्वीकारले नाही.
बाजारात एका नवीन बुलेट गाडीची किंमत दोन लाख ७५ हजार रूपये आहे. त्यानुसार ११ बुलेट गाड्यांची एकूण किंमत ३० लाख २५ हजार रूपये एवढी आहे. अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विराजसिंह निंबाळकर यांनी त्याही पुढे जाऊन महागड्या थार मोटारीची पैज जाहीर केली आहे. त्यांचीही पैज स्वीकारण्यासाठी कोणीही पुढे आला नाही.