अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी शरद पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता उत्तम जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत बोलताना आपल्या पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी पक्षाचा संस्थापक सदस्य असून मीच अजित पवार यांना पक्षातून काढून टाकू शकतो”, असे विधान उत्तम जानकर यांनी केले आहे. “मला अजून पक्षातून काढून टाकलेलं नाही. मी देखील दररोज विचारत आहे की, मला पक्षामधून काढले का? कारण पक्षाचा संस्थापक सदस्य मी पण आहे. मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो. कारण मी पक्षाचा सदस्य आहे. शरद पवारांना अजितदादा काढून टाकत असतील तर उत्तम जानकर अजित पवारांना काढायला अडचण काय? काढू शकतो”, असं उत्तम जानकर म्हणाले.