ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. पिचडांचे कार्यकर्ते हॉस्पिटलच्या बाहेर जमण्यास सुरुवात झालीय. प्रकृती सुधारत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.
मधुकर पिचड यांच्या निधनाच्या वृत्ताला वैभव पिचड यांनी दुजोरा दिलाय. मधुकर पिचड यांचे साडेसहा वाजता नाशिक येथे निधन झाल. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजुर येथे दुपारी चार वाजता होणार आहे. अकोले कॉलेज आणि पक्ष कार्यालयात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी ठेवले जाईल. सकाळी दहा वाजता मुळगाव देवठाण येथे जाणार आहे. मधुकरराव पिचड महाविद्यालयात नागरिकांना अंतदर्शनासाठी पिचड यांचे पार्थिव ठेवले जाईल. मग दुपारनंतर अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वैभव पिचड यांनी दिलीय.