माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांची जोडी सध्या ‘पंचक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट ५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे. सध्या माधुरी व श्रीराम नेने या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतीच या दोघांनी पुण्यातील एका चित्रपटगृहात हजेरी लावली होती.
माधुरी दीक्षितला यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी उखाणा घेण्याची विनंती केली. अभिनेत्रीने देखील सगळ्यांच्या आग्रहास्तव खास मराठीत उखाणा घेतला. नेने जोडप्याचे मराठीतील उखाणे ऐकून प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच आनंद व्यक्त केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.माधुरी उखाणा घेत म्हणाली, “पुणे तिथे काय उणे…इथे तर सर्वच झकास श्रीरामाचं नाव घेते पंचक बघणाऱ्यांसाठी खास” बायकोचा हा मराठी उखाणा ऐकून डॉ. नेने म्हणाले, “भाजीत भाजी मेथीची माधुरी माझ्या प्रितीची” दोघांचे मराठी उखाणे ऐकून उपस्थित प्रेक्षकांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं.