मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान निवडणूक लढणार आहेत. मात्र, काँग्रेसने शिवराज सिंह चौहान यांना चांगलीच डोकेदुखी दिली आहे. काँग्रेसने बुधनी येथून रामायण या लोकप्रिय मालिकेतील हनुमानाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याला तिकीट दिलं आहे. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
काँग्रसने अभिनेते विक्रम मास्ताल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. मास्ताल यांना बुधनी येथून तिकीट देण्यात आलं आहे. मास्ताल हे लोकप्रिय अभिनेते आहेत. 2008मध्ये आलेल्या रामायण मालिकेत मास्ताल यांनी हनुमानाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांची ही व्यक्तिरेखा अधिकच गाजली होती.