देशात पाच राज्यांच्या निवडणुकाचं रणसंग्राम सुरु असून 3 डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यापूर्वी मध्य प्रदेशातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत मतमोजणीचं सत्य समोर आणलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता स्ट्राँग रुममध्ये पोस्टल मते काढून त्यांची मोजणी करण्यात येत आहे. हा व्हिडीओ बालाघाटचा असल्याचा या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
त्यानंतर बालाघाटचे जिल्हाधिकारी डॉ. गिरीश कुमार मिश्रा यांनी स्ट्राँग रुममधून पोस्टल मतांमध्ये फेरफार केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. गिरीश कुमार मिश्रा यांच्यासह व्हिडीओमध्ये संबंधित त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी काँग्रसने निवडणूक आयोगाकडे केलीय.
काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, बालाघाट जिल्हाधिकारी डॉ. गिरीश कुमार मिश्रा यांनी 27 नोव्हेंबरला स्ट्राँग्र उघडत कुठल्याही अधिकृत्य परवानगी नसताना छेडछाड करत मतपेट्या उघडल्या आहेत. शिवराज सरकार आणि सरकारच्या अंधभक्तीत मग्न असलेला हा जिल्हाधिकारी लोकतंत्रासाठी मोठा धक्का असल्याच म्हटलं आहे.