Sunday, July 14, 2024

उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी भीषण आग; पुजाऱ्यासह १३ जण होरपळले,Video

मध्यप्रदेशच्या उज्जैन शहरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भयानक घटना घडली. महाकाल मंदिरात भस्म आरती सुरु असताना अचानक मंदिराच्या गर्भगृहात भीषण आग लागली. या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण होरपळले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन येथील महाकाल मंदिरात सोमवारी पहाटेच्या सुमारास भस्म आरती सुरू होती. या आरतीला शेकडो भाविक जमले होते. आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता.

याचदरम्यान मंदिराच्या गर्भगृहाला अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच भाविक धास्तावले. त्यांनी आरडाओरड सुरू करत मंदिराच्या बाहेर धाव घेण्यास सुरुवात केली. मात्र, आगीचा भडका उडाल्याने मंदिरातील पुजाऱ्यासह १३ भाविक आगीत होरपळले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles