14 डिसेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत एकत्र आल्याचा खुलासा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कोणत्याही संघटनेबरोबर एकत्रिकरण झालेले नसून, 14 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपाबाबत जिल्ह्यातील काही संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली होती. त्यामध्ये संघटनेच्या एकत्रीकरणाचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचा खुलासा संघटनेचे अध्यक्ष शिरीष टेकाडे व सचिव रमजान हवालदार यांनी केला आहे.
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या एकत्रिकरणासाठी गेल्या तीन महिन्यापासून जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरु आहे. काही ठोस मुद्दयांवर एकत्रीकरण होणे गरजेचे असल्याचे बहुसंख्य सदस्य व पदाधिकाऱ्यांचे मत आहे. एकत्रीकरणांमध्ये नवीन पदाधिकारी निवडताना संघटनेच्या घटनेनुसार फक्त 13 पदाधिकारी असावे, ती जम्बो कार्यकारणी असू नये, जिल्हा माध्यमिक सोसायटीच्या राजकारणाचा संघटनेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याने जिल्हा माध्यमिक सोसायटीमध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष अशी प्रमुख पदे देऊ नयेत. या मुद्द्यांच्या आधारे एकत्रीकरण होणार असेल तरच ते केले जाणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यात एकत्रीकरणाच्या विषयावर जिल्ह्यातील संघटनेच्या प्रमुख आजी-माजी पदाधिकारी व टीडीएफ पदाधिकाऱ्यांच्या दोन-तीन बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.
संघटनेचा हा निर्णय संघटनेचे कोषाध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष मिलिंद औटी, भास्कर कानवडे, बाळासाहेब पाचरणे, सुदाम दळवी, सहसचिव प्रमोद तोरणे, अरुण बोरणारे, बाबासाहेब थोरात, भालचंद्र नेहुल आदी संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित घेतलेला असून या निर्णयाला जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष मधुकर पवार, कार्यवाह भीमराज खोसे, सुरेश पाटील, नानासाहेब सुद्रिक, गोरक्षनाथ ठोंबळ, सुनील भुजाडी, ललित जगताप, सुनीता डाके या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र टीडीएफचे कार्यवाहक हिरालाल पगडाल, सहकार्यवाह अरविंद कडलग, जिल्हा संघटनेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढाळे, बी.पी. बोलगे, आबासाहेब कोकाटे, अशोक नवल, राजेंद्र लांडे, गजानन शेटे, सोमनाथ सुंबे, सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, दत्ता पाटील नारळे, जिल्हा गणित संघटनेचे अध्यक्ष संजय निक्रड यांनी एकत्रीकरण प्रक्रियेत सक्रिय भूमिका ठेवावी अशी आग्रही मागणी नवनाथ घुले, कल्याण ठोंबरे, शाहूराव औटी, दिलीप ढवळे, सुनील जगताप, जनार्दन पठारे, सर्जेराव मते, स्वप्निल लवांडे, राजेंद्र कळसकर, सचिन जामदार, योगेश्वर कुटे, सुधीर काळे, राजेंद्र सोनवणे, प्रशांत खंडागळे, राजेंद्र गोडसे, चंद्रकांत पवार, दादा गदादे, गोकुळ पवार, अजित वडवकर, सुरेश गोडसे, बाजीराव घुले, उत्तम खांडेकर, प्रवीण निळकंठ, राजेश शेंडगे, संजय ढेरे, सचिन फटांगरे, सुभाष पानसंबळ, शिवाजीराव वाकचौरे, सहकारी खेडकर, रमेश लाकूडझोडे, दत्तात्रय लांडे, संभाजी शेळके, अमोल देशमुख यांनी केली आहे.
पदाधिकाऱ्यांच्या मोठा खुलासा,माध्यमिक शिक्षक संघाचे कोणत्याही संघटनेबरोबर एकत्रिकरण नाही
- Advertisement -