भाजपमध्ये आता ‘वापरा आणि फेकून द्या’ असे धोरण आले आहे, अशा शब्दांत टीका करणाऱया भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना पक्षाने पूर्णपणे डावलले आहे. भाजपने उमा भारती यांना ना तिकीट दिले ना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले. यामुळे संतापलेल्या उमा भारती थेट हिमालयात जाऊन आत्मचिंतन करणार आहेत.
उमा भारती यांनी सोशल मीडियावर आपली ‘मन की बात’ केली आहे. चतुर्दशीपर्यंत आपल्या मातृकुल आणि पितृकुलच्या कूळ देवीला प्रमाण करून ओरछा रामराजा सरकारला माथा टेकून आपण हिमालयात जाऊन आत्मचिंतन करणार, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.