इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @gouls_kitchen_by_tanvigor नावाच्या अकाउंटने ही ‘मॅगी कटोरी चाट’ची रेसिपी शेअर केली आहे. यामध्ये, सुरवातीला मसाला न घालता शिजवलेल्या मॅगी नूडल्स, चहाच्या गाळण्यामध्ये घालून त्याला एका वाटीसारखा आकार दिला आहे. आता गाळण्यामध्ये नूडल्स तसेच ठेऊन तेलामध्ये तळून घेतल्या आहेत. नंतर बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो एका वेगळ्या वाटीमध्ये घेऊन त्यात लाल तिखट, चाट मसाला, हिरवी चटणी घालून सर्व मिश्रण एकत्र मिसळून घेतले आणि तळून कुरकुरीत झालेल्या नूडल्समध्ये घातले आहे. यावर शेवटी दही, हिरवी चटणी आणि शेव घालून, मॅगी कटोरी चाट बनवल्याचे आपण पाहू शकतो.
Video: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय जान्हवी कपूर,प्रेमाची कबुली