सध्या सोशल मीडियावर मॅगी पराठ्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. महिला आधी चपाती लाटते, नंतर त्यावर आधीच तयार केलेली मॅगी पसरवते. यानंतर, ती मॅगीच्या वर दुसरी कच्ची चपाती ठेवते आणि नंतर खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूच्या चपात्या व्यवस्थित चिकटवते. यानंतर, ती तो पराठा तव्यावर ठेवते आणि मॅगी पराठा बेक करते. अशा प्रकारे तिचा मॅगी पराठा तयार होते. मग ती पराठ्याचे चार तुकडे करून प्लेटमध्ये सर्व्ह करते. यादरम्यान ती पराठ्याचा एक तुकडा उचलून त्याच्या आतमध्ये भरलेली मॅगीही दाखवते.
- Advertisement -