Saturday, January 25, 2025

आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगारच्या शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक

आ. जगताप यांच्या माध्यमातून मेट्रो सिटीचे स्वप्न साकारले जाणार -शिवम भंडारी
नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघात तिसऱ्यांदा सलग निवडून आलेले आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील ग्रामदैवत शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक घालण्यात आला. शुक्लेश्‍वर मंदिरात विधीवत पूजा पार पडली. याप्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवक काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी, अनिल तेजी, किशोर उपरे, गणेश उपरे, विशाल (अण्णा) बेलपवार, दीपक राहिंज, विशाल राहिंज, आनंद क्षीरसागर, रत्नदीप गारुडकर, प्रमोद जाधव, दिनेश लंगोटे, योगेश देवतरसे, करण पाटील, रवी नामदे आदींसह भिंगार मधील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, संग्राम जगताप हे युवकांचे नेतृत्व असून, त्यांनी शहर व उपनगरांचा विकासात्मक कायापालट केला आहे. त्यांच्या माध्यमातून शहराला मंत्री पदाची संधी मिळावी ही सर्वसामान्य नगरकरांची इच्छा आहे. अनेक वर्षापासून शहराला मंत्री मंडळात स्थान मिळालेले नाही. सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आ. जगताप यांना मंत्रीपद मिळावे ही सर्वांची इच्छा असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
शिवम भंडारी म्हणाले की, शहराच्या सर्वांगीन विकासासाठी आ. जगताप यांना मंत्रीपद मिळणे आवश्‍यक आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन शहरातील विकास कामे मार्गी लावली. विकासात्मक व्हिजन असलेले आ. जगताप यांची मंत्रीमंडळाला देखील चांगली मदत होणार असून, शहराच्या इतिहासात सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. विकासाचे व्हिजन ठेऊन त्यांनी केलेल्या कामाला यापुढे अधिक गती मिळणार आहे. तर त्यांच्या माध्यमातून मेट्रो सिटीचे स्वप्न साकारले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles