आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनेही बैठकांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मंगळवारी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासाठी बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडीने राज्यात ४६ जागांवर लढण्याचा निर्धार केला आहे. तर दोन जागा या मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याची तयारी दर्शवली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट २२ जागा लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर काँग्रेसच्या वाट्याला १४ जागा आल्याचं सांगण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादी १० जागांवर लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी एक जागा वंचित बहुजन आघाडीला देणार आहे. तर एक जागा माजी खासदार राजू शेट्टी यांना देणार आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटप करताना २०१९ साली ज्या जागा निवडून आल्या आहेत. त्या जागा त्याच पक्षाला देणार असल्याची माहिती मिळत आहे. तर महाविकास आघाडीने दोन जागा या मित्रपक्षांना देण्याची तयारी दर्शवली आहे.