लोकसभा निवडणुकीत बांधलेल्या वज्रमुठीचा महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला. ४८ पैकी तब्बल ३१ जागा जिंकत त्यांनी राज्यात मोठी मुसंडी मारली. आता विधानसभा निवडणुकीतही अशीच एकजूट ठेवून लढण्याचा निर्धार तिन्ही पक्षांनी केलाय. यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी खास रणनिती आखली आहे.
जिथे ज्या पक्षाची जास्त ताकद असेल, त्या जागेवर त्याच पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला जाईल.
सध्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात काँग्रेसची जास्त ताकद आहे, त्यामुळे इथे काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे.
कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागात उद्धव ठाकरेंची मोठी ताकद असल्याने या विभागात त्यांना सर्वाधिक जागा मिळतील.
शरद पवार यांच्या पक्षाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत ताकद असल्याने त्यांना तिथल्या जागा दिल्या जातील.
लोकसभेच्या जागावाटपावेळी सांगलीसारख्या चुका टाळण्याचा तिन्ही पक्षाचा प्रयत्न असेल.
लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अधिक ताकदीने लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असेल.