Sunday, July 21, 2024

Agri News कापूस सोयाबीन, इतर तेलबिया उत्पादकता वाढ कृती योजना… शेतकऱ्यांनी इथं करा ऑनलाईन अर्ज

मुंबई दि. 16 : कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षांसाठी विशेष कृती योजना राबवित आहे. एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी राज्य पुरस्कृत विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे (mahadbt.maharashtra.gov.in) अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ही विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये पुढील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत तर मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी 23 जून, २०२४ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.

या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.

जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles