राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे माढातून लढण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जानकर यांनीही माढा लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काल जानकर यांच्या जनस्वराज्य यात्रेचा माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण येथे समारोप झाला. यावेळी महादेव जानकर यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले.मला स्वतःच्या ताकदीवर आता दिल्लीला जायचे आहे. माझे मन मुंबईत रमत नव्हते. मला दिल्लीला जायचे होते. माझ्यावर दबाव टाकून मला राज्यात मंत्री करण्यात आले, असा गौप्यस्फोट महादेव जानकर यांनी केला.
मागच्या लोकसभा निवडणुकीत काय झाले? याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली होती. मात्र, मी आत्महत्या करेन पण कमळ आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असं मी भाजपला सुनावलं होतं, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला.