Tuesday, April 23, 2024

लोकसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांच्यावर प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी…

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचारप्रमुख म्हणून कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. याबाबतचे पत्र त्यांना आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात देण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles