Saturday, January 18, 2025

सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नव्या विहिरींना 4 लाख, तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत अनुदान मिळणार

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले. यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे. आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते.

इनवेल बोअरिंगसाठी आता 40 हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी 50 हजार रुपये आणि परसबागेकरिता 5 हजार देण्यात येईल. नवीन विहिरींबाबत 12 मिटर खोलींची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच दोन सिंचन विहिरींमधील 500 फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे. शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सध्या 1 लाख रुपये अनुदान देण्यात येते. आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल.

त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या 25 हजार रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचन संच 47 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल. अशाचप्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प आणि बहुभूधारकांना 97 हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. याशिवाय इतरही अनेक निकषांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles