अकोला, जिल्ह्यातील तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. बाजार समितीचा सभापती, उपसभापतीसह सचिव या तिघांना एक लाखाची रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे.
त्यांना अटक करून तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापती सुनील इंगळे, उपसभापती प्रदीप ढोले आणि सचिव सुरेश सोनोने अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराचे कंत्राटचे बिल काढण्यासाठी या तिघांनी लाचेची मागणी केली होती.