मुंबई: ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभार लावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पाच हजार व तीन हजार रुपये मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे.
१२ ऑगस्टपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मुंबईत हुतात्मा चौकात आंदोलन करीत आहेत. राज्यात एक लाख २० हजार अंगणवाडी सेविका व ६० हजार मदतनीस आहेत. त्यांना १२ हजार रुपये मानधन आहे. मदतनीसांना ८ हजार रुपये मानधन आहे. त्यांच्या मानधनात वाढ व्हावी अशी गेली अनेक वर्षांची मागणी आहे. आशा सेविकांच्या मानधन दरमहा १५ हजार करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात बळ आले आहे. अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनीस यांना तीन हजार रुपये वाढ देण्यात यावी असा प्रस्ताव महिला विकास विभागाने वित्त विभागाला दिला आहे.
अंशकालीन सफाई कर्मचारी पोलिस विभाग यांचे वेतन किती असते ते पण सांगा त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती द्या
अंगणवाडीमध्ये सेविका 10000 मानधन आणि मदनीस 5400 आहे