Saturday, March 2, 2024

अंगणवाडी सेविकांचं ४८ दिवसांपासून आंदोलन.. सरकारकडून तोडग्याऐवजी कारवाईच्या नोटिसा

गेल्या ४८ दिवसांपासून राज्यभरात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे. विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करा, अंगणवाडी सेविकांना वेतनश्रेणी, भविष्यनिर्वाह निधी लागू करा, अंगणवाडी सेविकांना २६ हजार रूपये मानधन देण्याच्या मागणीसह राज्यभरात अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहे. मात्र अंगणवाडी सेविकांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जातोय. आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांचं आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईची नोटीस पाठवल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केलाय. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. दावोसला जाण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत. मात्र अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles