महाराष्ट्र व केंद्र शासनच्या एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजने चे राज्यातील महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना. सलग्न CITU यांच्या वतीने मुंबईतील राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या जीवनदायी भवना समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन
सरकारने राज्यातील गोर, गरीब गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून २०१२ पासून राजीव गांधी योजना सुरु केली. पुढे या योजनेत अनेक बदल करून सध्या राज्यात हीच योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य या नावाने सुरु आहे. नुकतीच या योजनेची आयुष्मान भारत योजनेशी सांगड घालून रुग्णांना पाच लाख रुपयांचा लाभ देण्याची घोषणा झाली. ही जीवनदायी योजना सुरु झाल्यापासून योजनेचा कणा ठरलेल्या आरोग्य मित्रांची मात्र यात फरपट झाल्याने आरोग्य मित्रच आजारी पडल्याचे चित्र आहे. इन्शुरन्स पद्धतीने योजना चालविणाऱ्या टी.पी.ए. कंपन्यांकडून आरोग्य मित्रांची नेमणूक केली जाते. हे आरोग्य मित्र रुग्णालयात रुग्णांची ऑनलाईन नोंदणी, योग्य सल्लामसलत, रुग्णांना मोफत उपचारासाठी योग्य ती मदत करतात. कोरोना सारखी जागतिक महामारी आली तेव्हा प्रत्येक जन आपला जीव वाचवण्यासाठी एकांतवासात होता मात्र योजनेचे आरोग्यमित्र आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे रुग्णाची सेवा केली मात्र या रुग्ण मित्रांना अनेक वर्षांपासून कंपन्यांकडून तुटपुंजे मानधन मिळत आहे,विविध कर्मचारी सुविधा मिळत नसल्याने,उदा. बेसिक पगार,मेडिकलेम,दिवाळी बोनस,वार्षिक वेतनवाढ सारख्या सुविधा मिळत नाहीत अशा विविध मागण्यांसाठी सी.आय.टी.यू. संलग्न आरोग्य मित्र संघटनेच्या अंतर्गत राज्यातील जवळपास हजारोच्या संख्येने आरोग्य मित्र येत्या २३ तारखेला मुंबईतील जीवनदायी भवन येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे. या परिस्थितीत जबाबदार कंपनीचे व्यवस्थापन जबाबदार हाय कारण वेळोवेळी चर्चा साठी विनंती करूनही अद्याप पर्यंत व्यवस्थापनाने चर्चा करायची संधी दिली नाही म्हणून आमचे मनाच्या विरोधात रास्त मागण्यासाठी जे कायदेशीर बाब आहे बळजबरी आम्ही सर्व मित्रांना या परिस्थितीमध्ये ढकलले गेले आहे म्हणून जनसामान्य माणसाला त्रासास समोर जावे लागत आहे याला जबाबदार कंपनीचे व्यवस्थापन आहे तरीसुद्धा आम्ही सर्व आरोग्य मित्र आमच्या वतीने त्रास नसून सुद्धा या परिस्थितीचे दिलगिरी व्यक्त करतो या पत्राद्वारे तमाम जनतेला विनंती की या कायदेशीर मागण्यांमध्ये आपला पाठिंबा द्यावी त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन तातडीने कंपन्यांना आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्देश देणे गरजेचे आहे. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आरोग्यमित्र या आंदोलनात सहभागी होऊन वरळी जीवनदायी भवन येथे निर्देशन करणार आहेत यावेळी याचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड डॉ डी एल कराड साहेब, कॉम्रेड एल आर राव धुळे ,कॉम्रेड तुकाराम सोनजे, व संघटनेचे सर्व आरोग्य मित्र उपस्थित असणार आहेत.
रूग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या ‘आरोग्य मित्रांची’ फरफट…. मुंबईत आंदोलनाची तयारी…
- Advertisement -