आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील अंतर्गत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार मविआमधील कोणता पक्ष किती जागा मिळणार याबाबतचा अंदाज समोर आला आहे. साम टीव्हीच्या हाती काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेची माहिती लागली आहे. काँग्रेसच्या या प्राथमिक सर्व्हेनुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सर्व्हेनुसार सर्वाधिक जागा ८०-८५ जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसला ८० ते ८५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या पक्षाला ५५ ते ६० जागा तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ३० ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर या सर्व्हेनुसार भाजपला ६०-६२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना शिंदे गटाला ३०-३२ तर अजित पवारांच्या पक्षाला ८-९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या या प्राथमिक सर्व्हेत महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.