एकीकडे विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असतानाच महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार घमासान सुरु असून वाद मिटवण्यासाठी थेट दिल्ली हायकमांडने मध्यस्थी केली आहे. नाना पटोले यांच्याविरोधात ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे आता बाळासाहेब थोरात हे काँग्रेसकडून शरद पवार गट तसेच उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत मविआच्या नाराजी नाट्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.