विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशी चर्चा असताना आता तीनही पक्षांची हे पद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे, अशी बातमी इंडिया टुडेने दिली.
सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या बातमीनुसार, त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्ष पद मागितले आहे. याचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेतेपदाचा चेहरा कोण असणार, यावर अद्याप मविआच्या घटक पक्षांची चर्चा झालेली नाही.
शिवसेनेने (ठाकरे) भास्कर जाधव यांना पक्षाचा गटनेता तर सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद म्हणून नेमले आहे