Sunday, July 14, 2024

विधानसभेला राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार? प्रफुल पटेलांनी मोठा आकडा सांगितला

लोकसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपावरुन झालेली रस्सीखेच अन् त्यानंतर अवघ्या चार जागा मिळालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभेला मात्र सावध पवित्रा घेतला आहे. विधानसभेत लोकसभेसारखी फरफट होऊ द्यायची नाही, असे राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभेला राष्ट्रवादी नेमकी किती जागा लढणार? याबाबत चर्चा सुरू असतानाच आता प्रफुल पटेल यांनी थेट मोठा आकडा सांगून टाकला आहे.

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच महायुतीमध्येदेखील आता जागा वाटपाचे गणितं जुळवू लागले आहेत. गोंदिया मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल यांना विचारले असता जुन्या राष्ट्रवादीच्या पकडून आमच्याकडे एकूण 57 आमदार होते. ही गोष्ट लक्षात घेता आम्ही विधानसभेत 85 ते 90 जागा मागणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.

तसेच “लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि जी पद खाली आहेत त्या ठिकाणी विस्तार करून वाचलेल्या महिन्यात चांगल्या जोमाने काम करता येणार आहे असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. केंद्रामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्रीपद आले तर ते मलाच मिळणार,” योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल असा दावाही प्रफुल पटेल यांनी केला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांसारखी परिस्थिती विधानसभेला नसेल. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती काहीतरी वेगळी राहील विधानसभा निवडणुकीमध्ये पिक्चर बदलेल असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles