Sunday, September 15, 2024

बदलापूर घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडवर… दोन शिक्षणाधिकारी निलंबित…

बदलापूर घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकचे (BMC) शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांचे निलंबन करण्यात आले आहे. महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प अंमलबजावणी न केल्यासाठी त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांच देखील निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. शिक्षणाधिकारी यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बदलापूरमधील घटनेनंतर गृह खातेही अॅक्शन मोडवर असून बदलापूरच्या पोलीस निरीक्षक शितोळे यांचे निलंबन करुन त्यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles