राज्यातील बहुचर्चित तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींच्या अडचणी वाढल्या होत्या. पण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (इओडब्ल्यू) दिलासा दिला. तसेच, या घोटाळ्या प्रकरणी कोणतेच पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटलें. जानेवारी महिन्यात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
अजित पवार यांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार असून त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांना वेळ दिला आहे. तर 29 जूनला पुढची सुनावणी होणार आहे