Monday, February 17, 2025

लाच प्रकरणी कोतवाल ‘एसीबी’च्या जाळ्यात… कारवाईनंतर तहसीलदार फरार…

बीडमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकानंतर पाटबंधारे विभागातील इंजिनीयरला पकडल्यानंतर आणि आता केजमधील तहसीलदारावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली आहे. रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी 20 हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचा तहसीलदार अभिजित पाटील हा देखील यात आरोपी असून तो फरार झाला आहे.

धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री 10 वाजता ही कारवाई केली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सुरूच आहे. एसीबीकडूनही कारवायांचा धडाका चालूच आहे. अभिजित पाटील हा केजचा तहसीलदार आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल असून पाटील याच्यासाठी वसूलीचे काम करतो.

केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार अभिजीत पाटील याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. हीच लाच कोतवाल माने याने स्विकारली आणि यावेळी तो लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडलं. परंतू तहसीलदार अभिजीत पाटील हा फरार झाला आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील दुसरी कारवाई बीड जिल्ह्यात केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles