Friday, January 17, 2025

विधानसभा निवडणुक‌ एकट्या ‘देवाभाऊं’च्या नेतृत्वाखाली नाही… भाजपने आणखी दोन नावे समाविष्ट केली

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. नागपुरात अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना पत्रक वाटण्यात आले आहेत. त्यात अमित शाहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या मार्गदर्शनात आपल्याला पूर्ण क्षमतेने विधानसभा निवडणुकांचा सामना करायचा आहे असं उल्लेख करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकत नाही. तोवर कोणीही थकणार नाही, थांबणार नाही, विश्रांती घेणार नाही… आता सर्वांचा एकच लक्ष्य आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक…. असा उल्लेखही या पत्रकात करण्यात आला आहे. महाराष्ट्रात परीक्षेच्या काळात काही लोक आपल्याला चक्रव्युहात अडकवू पाहत आहे. मात्र आपल्याला तो चक्रव्यूह भेदायचा आहे असा कानमंत्र ही कार्यकर्त्यांना या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुका संदर्भात काही सूचना आणि नियोजन बद्दलचा मार्गदर्शन ही कार्यकर्त्यांना लेखी स्वरुपात देण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles