महाराष्ट्राच्या नव्या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्या, रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना अर्धचंद्र देण्याचा निर्णय झाला आहे. भाजपच्या गिरीश महाजन व रवींद्र चव्हाण यांना, तर शिवसेनेच्या संजय राठोड, तानाजी सावंत व दीपक केसरकर यांना मंत्रिपदाऐवजी संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे.
नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये जुन्या मंत्रिमंडळातील गिरीश महाजन व रवींद्र चव्हाण यांच्या जबाबदारीमध्ये पक्षवाढीसाठी बदल करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते. यापैकी गिरीश महाजन यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असून, रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नवीन मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार असून, त्यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.
चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिमंडळात….भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण ?
- Advertisement -