Thursday, January 23, 2025

भाजपचे ऑपरेशन ‘लोटस’, शरद पवार गटाचे खासदार राजीनामे देऊन भाजपकडून लढणार!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मविआच्या खासदारांमध्ये चलबिचल असल्याच्या चर्चा आहेत. मविआचे खासदार भाजप आणि इतर पक्षांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर आली आहे.

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीमधील खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीचे खासदार ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आहेत, विशेषत: शरद पवार साहेबांचे खासदार जिथं आहेत तिथं महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्याचबरोबर विकास हाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर आपलं राजकीय भविष्य नीट व्हावं असं त्यांना वाटत असेल. केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. आपल्या मतदारसंघात विकासकामं करणं प्राधान्याचा विषय राहणार आहे. स्वत:चं राजकीय भविष्य, कार्यकर्त्यांचा आग्रह, ज्यासाठी निवडणूक लढवतो तो विकास अशी मानसिकता असेल तर यासाठी शरद पवार साहेबांचे खासदार अशी भूमिका घेऊ शकतात. आपल्याला विकास हवा असेल तर सत्तेच्या माध्यमातून गतीनं विकास करता येतो. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं भक्कम सरकार दोन्ही ठिकाणी आहे. त्यामुळं अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो. शरद पवार साहेबांचे असतील किंवा मविआचे खासदार आमच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात राहण्याची शक्यता आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles