मुंबई: लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी
लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी थेट
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली
आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
उडाली. भाजपमधील नेते, पदाधिकाऱ्यांसाठीही हा धक्का
सहन होत नाही. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर
पक्षाचे नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटने चर्चेला तोंड
फोडलं आहे.
मोहित कंबोज यांनी दुपारी 2.52 वाजता द्विट करत'” सिर्फ एक आदमी की लाइन छोटी करने के चक्कर में पार्टी का नुकसान किया!’ असे म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि मुंबई भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पराभवाची जबाबदारी कोण घेणार? वरिष्ठ नेते, मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करायला हवी,” असे कंबोज यांनी म्हटले आहे.