Wednesday, June 19, 2024

आता विधानसभेला भाजपच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही.. शिंदे सेनेनं सुनावलं..

भाजपच्या आयडोलॉजिचा फटका पडला नाही. काही गणितं चुकली, सर्व्हे नावाचं भूत जे डोक्यात गेलेलं ते आता निघेल. एका मतदारसंघात 12 सर्व्हे याने होतं नाही. नागरिकांची मतं ही महत्वाची आहेत. आम्हाला लोकसभेला झालेल्या चुका या विधानसभेला होणार नाहीत, विधानसभेला उमेदवारही लवकर जाहिर होईल, यादीही लवकर जाहिर केली जाईल, असेही ते म्हणाले. आमच्यावर तसा दबाव नव्हता मात्र केंद्रात सत्ता हवी भाजप एक पाऊल पुढे आहे. मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे. त्यांची आयडोलॉजी वापरली तर फायदा होईल. म्हणून त्यांच्या मर्जीनुसार आमचा कल त्यांच्याकडे झुकला. मात्र त्याचं गणित चुकलं त्याचा फटका बसला. मात्र ते मान्यही त्यांनी केलं, असेही शिरसाट यांनी सांगितले. , असे शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले.

भाजपच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही. ही निवडणूक सामंजस्यातून लढवली गेली. आता त्यांना दोन्ही पक्षाचं ऐकावं लागेल. झाल ते गेलं यापुढे सर्वांच्या संमत्तीने उमेदवार दिले, प्रयत्न केले तर सरकार यायला काही अडचण नाही, असेही शिरसाट म्हणाले. मोदींच्या नावावर किंव चेहरयामुळे खालची नेते मंडळी सुस्थावली गेली. काही लोकांची वक्तव्यही अतिउत्साही होती. सरकार आने वाली हे बोलो कुच्छबी… असं चालणार नाही. तुम्ही बोलता हे लोकं एकत असते त्यानुसार ते मत बनवतं असतात, लोकांची मत मतपेटीपर्यंत न्यायची असतील तर त्यांच्यात जावं लागेल. वादग्रस्त वकतव्याबाबत नेत्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles