विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख ठरली आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी (ता. २१) दुपारी बारावीचा निकाल जाहीर होणार, अशी माहिती बोर्डाने दिली आहे. विद्यार्थ्यांना १ वाजता ऑनलाइन निकाल पाहता येणार, असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
दहावी-बारावीची निकाल लागण्याच्या एक दिवस आधी राज्य मंडळाकडून पत्रक प्रसिद्ध केले जाते. शिक्षण बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर होईल.
या अधिकृत वेबसाईटवर पाहा निकाल –
– maharesult.nic.in
– mahahsscboard.in
– hsc.maharesults.org.in
– hscresult.mkcl.org
– results.gov.in.