Sunday, December 8, 2024

मोठी बातमी! राष्ट्रवादीला आणखी ४ मंत्रीपदे मिळणार, भाजप-शिंदे गटाला….

राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार यांनी युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. अजित पवार यांच्या पाठींब्यामुळे युती सरकार मजबूत झालं असलं, तरी त्यांच्या एन्ट्रीने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी मागणी सुद्धा भाजप आणि शिंदे गटातील आमदारांकडून केली जात आहे.
युती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार असून यामध्ये १४ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाला समान जागा मिळणार आहे, इंडियन्स एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

इंडियन्स एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या गटाला ४ मंत्रिपदे मिळणार आहे. यामध्ये एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. तर भाजप आणि शिवसेना यांना प्रत्येकी ५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हा विस्तार पार पडेल, असंही सांगण्यात आलं आहे.
युती सरकारमध्ये तिन्ही पक्षांना मिळून एकूण ४३ मंत्रिपदे मिळणार आहे. यामध्ये अजित पवार आणि शिंदे गटाला प्रत्येकी १४ तर भाजपला १५ मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत तिन्ही पक्षांच्या २९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता १४ मंत्रिपदेच शिल्लक असून यामध्ये कुणाची वर्णी लागणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles