मुंबई: या सरकारचा पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीनी दिली आहे. १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार असल्याने या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले नाव असेल का, याची उत्सुकता शिवसेना भाजप नेत्यांमध्ये पहिला मिळत आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याने आता पालकमंत्री पदाची माळ गळ्यात पडते की नाही, याची वाटत बघत आहेत. या मंत्रिमंडळात १४ मंत्र्याचा समावेश होणार असल्याची माहिती भेटत आहे. सध्याचा सरकारमध्ये तीन पक्ष असल्यानी शिवसेना आणि भाजपमधील काही आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार आहे. त्यामुळे कदाचित विस्तार लांबणीवर जात आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, शिवसेनेच्या ४ आमदारांना डच्चू?
- Advertisement -