Monday, July 22, 2024

ईअर टॅगिंग नाही तर जनावरांची वाहतूक नाही आणि वैद्यकीय सुविधाही नाही…

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे. पशुधनाची माहिती एकत्ररित्या उपलब्ध व्हावी त्यांचे आजार ,लसीकरण, यासह इतर माहिती मिळावी यासाठी भारत पशुधन प्रणाली सुरू करण्यात आली आहे .या प्रणालीवर पशुधनाची नोंद करण्यासाठी सर्व पशुंना ईअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे .त्या मधील बारा अंकी कोड मुळे संबंधित पशुधनाच्या माहितीची नोंद होणार आहे. पशुधनाचे मालक खरेदी ,विक्री, आजार लसीकरण, प्रजनन आदी विविध माहितीही मिळणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी पशुधनास ईअर टॅगिंग करणे बंधनकारक आहे .कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंग शिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार, जनावरांचे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे.

नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची टॅगिंग असल्याशिवाय मालकांना नुकसान भरपाई मिळणार नाही. जनावरांच्या विक्री व वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, आरोग्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत. त्यामुळे पशुपालकांनी यांची काळजी घ्यावी भविष्यामध्ये येणाऱ्या पशुधनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय भविष्यात पशुधन योजनांचा लाभ मिळणार नाही. सर्व पशुंना ईअर टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंग शिवाय वाहतूक करण्यास बंदी राहणार आहे. जनावरांना टॅगिंग नसल्यास संबंधित वाहतूकदार जनावरांचे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे तसेच टॅगिंग असल्याशिवाय खरेदी विक्रीलाही बंदी करण्यात येणार आहे. विनापरवाना कोणी वाहतूक करत असेल तर अशावेळी आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles