छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरु झाली. त्यानंतर भुजबळ मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात आले नाही. सोमवारी सकाळी भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय असलेले प्रमोद हिंदूराव यांना पक्षाने त्यांना भेटण्यासाठी पाठवले. त्या भेटीनंतर भुजबळ यांची नाराजी दूर झाली नाही. सोमवारी दुपारी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी वैतागून आपण नाराज असल्याचे मान्य केले. होय, मी नाराज आहे, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. अजित पवार यांच्याशी काही संवाद झाला का? त्यावर भुजबळ म्हणाले, मी कालपासून अजित पवार यांच्याशी बोललो नाही. मला ते गरजेचे वाटले नाही. मी पुढे काय करायचे त्याचा निर्णय अजून घेतला नाही. त्यासंदर्भात मी माझ्या लोकांशी बोलणार आहे. समता परिषदेच्या लोकांशी बोलणार नाही. त्यानंतर निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
अजित पवारांशी बोलायची गरज वाटली नाही, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी बोलणार
- Advertisement -