लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा ही निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये घेण्यात आली.
निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला होता. मात्र, “या घोषणेमुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं”, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ‘४०० पार’च्या घोषणेमुळे एनडीएचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भुजबळ म्हणाले, “एनडीए ४०० पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकी नऊ आले होते.”