Sunday, July 21, 2024

भाजपचा मेगा प्लॅन…विधानपरिषदेच्या सभापतीपदी आ.राम शिंदे ?

सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचा सभापती निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सत्ता कायम राहील की नाही याबद्दल साशंकता असल्यानं भाजपनं विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतर होईल. त्यामुळे आताच आपला सभापती बसवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे, प्रविण दरेकर आणि निरंजन डावखरेंची नावं आघाडीवर आहेत.येत्या आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक होऊ शकते. सत्तेत असलेल्या घटक पक्षांपैकी कोणीही भाजपच्या उमेदवाराला विरोध करणार नाही. राम शिंदे पुढील सभापती असू शकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles